शाळा, शाळेतलं शिक्षण, आणि त्याची क्वालिटी हे आपल्या सर्वांचे आवडते चर्चेचे विषय. शाळेत काय शिकवतात? शिक्षकांनाच किती येतं? मुलांकडं लक्षच नसतं शिक्षकांचं, सिलॅबसमधेच प्रॉब्लेम आहे... अशी सगळी चर्चा शेवटी 'हे असंच चालायचं' इथपर्यंत येऊन थांबते. आपण सगळे सुशिक्षित आणि हुशार पालक 'एज्युकेशन सिस्टीम' कशी बेकार आणि होपलेस होत चाललीय, यावरच चर्चा करुन थांबतो. जर ह्या सिस्टीममधे प्रॉब्लेम आहेत, तर त्या प्रॉब्लेमवर काहीतरी उपाय शोधायचा की नुसती नावं ठेवून पुन्हा त्याच सिस्टीममधे आपल्या मुलांना सोडून द्यायचं? आपलं शिक्षण, अनुभव, कर्तृत्व यांचा काहीच उपयोग नाही करता येणार? आपण खरंच एवढे असहाय्य, एवढे हेल्पलेस आहोत?
नाही, आम्हाला नाही असं वाटत! आपणही याच सिस्टीममधून शिकलोत आणि त्याचे फायदे आजही मिळवत आहोत. पूर्ण सिस्टीम खराब नाहीये, तर काही-काही ठिकाणी तिच्यात प्रॉब्लेम्स निर्माण झालेत. बोटाला जखम झाली तर आपण हातच कापून टाकतो का? नाही ना? मग सिस्टीममधल्या प्रॉब्लेम्सवर उपाय शोधण्याऐवजी आपण सिस्टीमला दोष देऊन मोकळे कसं होऊ शकतो? आपण प्रयत्न केला तर बदल होऊ शकतो. पूर्ण सिस्टीममधे नाही होणार कदाचित, पण आपल्या मुलांसाठी तरी नक्कीच होईल. आणि असा विचार करुन प्रत्येकानं बदल घडवायचं ठरवलं तर सिस्टीम बदलायला कितीसा वेळ लागेल?
हा बदल करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? आपण नक्की काय करु शकतो? आपल्याला खरंच काही करता येऊ शकेल का? असे प्रश्न आम्हालाही पडतात. स्वतःपुरती काही उत्तरंही आम्ही शोधलीत. पण असे प्रश्न ज्यांना पडतात ते सर्वजण एकत्र आले तर अजून बरीच उत्तरं सापडतील, असं आम्हाला वाटतं. एका व्यक्तिचं ज्ञान, कौशल्य, आणि वेळ यांना मर्यादा असतात. पण समान विचारांची अनेक माणसं एकत्र आली तर त्या सगळ्यांची बेरीज आपल्याला अपेक्षित उत्तरापर्यंत नक्कीच घेऊन जाऊ शकेल.
ज्यांना ह्या एज्युकेशन सिस्टीममधे प्रॉब्लेम वाटतोय, आणि फक्त बोलण्यावर न थांबता प्रत्यक्ष काहीतरी करायची ज्यांची तयारी आहे, त्या सर्वांसाठी एक प्लॅटफॉर्म देतोय 'मँगो अकॅडमी'चा 'टुगेदर फॉर एज्युकेशन' प्रोजेक्ट! आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत जाणवणार्या समस्यांवर चर्चा करणं, त्यावर आपल्याला करता येतील असे उपाय शोधणं, आणि एक प्रॅक्टिकल ॲक्शन प्लॅन बनवणं, हे या प्रोजेक्टचं उद्दिष्ट आहे. यात सहभागी होण्यासाठी कसल्याही अटी नाहीत. फक्त पॉझिटीव्ह ॲटीट्यूड पाहिजे आणि स्वतःसाठी, आपल्या मुलांसाठी काम करायची तयारी पाहिजे.
प्रत्येक समस्येवर रामबाण उपाय आमच्याकडंही नाहीत. पण आपल्या प्रश्नांची उत्तरं आपणच शोधू शकतो, हा विश्वास मात्र आहे. तुम्हालाही असा विश्वास वाटत असेल तर जरुर सामील व्हा...
...मॅंगो अकॅडमीच्या 'टुगेदर फॉर एज्युकेशन' प्रोजेक्टमधे!
संपर्कः ९८२२४०१२४६, ९९२२९१६६३९