Tuesday, 13 May 2014

मुलांसाठी दोन दिवसीय उन्हाळी शिबिराचे आयोजन

मुलांचा उन्हाळी सुट्टीतील वेळ मौजमजेसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी वापरता यावा या हेतुने, जयहिंद परिवार व सुपरस्टार एज्यु. मीडिया यांच्यातर्फे कोथरुडमधे दोन दिवसीय उन्हाळी शिबिर (समर कॅम्प) घेण्यात येणार आहे. दि. २३ व २४ मे २०१४ रोजी कोथरुडच्या गांधीभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरासाठी व्यक्तिमत्व विकास, अभिनय कार्यशाळा, ध्यानधारणा, एकाग्रता वाढीसाठी व्यायाम, कथालेखन कार्यशाळा, मुलांपुढील आदर्श व्यक्तिमत्वांची माहिती, पपेट मेकींग, ओरिगामीवर आधारीत भूमिती अर्थात् जॉयमेट्री, सामाजिक लघुपट, आणि नृत्य कार्यशाळा असा भरगच्च कार्यक्रम आखण्यात आला आहे. शिबिरासाठी ६ ते १४ वयोगटातील मुलांचा सहभाग अपेक्षित असला तरी, काही उपक्रमांमधे मुलांबरोबरच पालकांनाही सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे. विविध कला व अभ्यास क्षेत्रांतील तज्ज्ञ या शिबिरातून मुलांना मार्गदर्शन करतील, तसेच मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळवून देण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष कृतीतून या सर्व विषयांची ओळख करुन देतील. शिबिरात सहभाग घेणार्या सर्व मुलांना संयोजकांतर्फे प्रमाणपत्रे देण्यात येतील. तसेच शिबाराच्या समारोपावेळी लकी ड्रॉ पद्धतीने काही भाग्यवान विजेत्यांना आकर्षक बक्षिसेही देण्यात येतील. प्रसिद्ध सिनेतारका अमृता घुगे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षिस वितरण केले जाईल. सदर शिबिरासाठी रु.७५० इतके शुल्क असून, दि. १८ मे पूर्वी नोंदणी करणार्यांस शिबिर शुल्कामधे रु.१०० ची सूट मिळेल. शिबिरासाठी नावनोंदणी ‘खावाकी फूड प्रॉडक्ट्स, शॉप नं.३, शिवरुद्र सोसायटी, आशिष हॉलसमोर, नविन डी.पी. रोड, कोथरुड’ येथे सुरु आहे. अधिक माहितीसाठी ९८२२४०१२४६ (मंदार), ९८२२४१८१२१ (आकांक्षा), ९८९०६४०११२ (माधवी) यांच्याशी संपर्क साधावा.


No comments:

Post a Comment